येस बँक व त्यांच्या रिकव्हरी एजंटांनी बेकायदेशीररीत्या ट्रॅक्टर जप्त करून, कर्जाशी संबंध नसलेला रोटाव्हेटर चोरी करून नेणे, हप्ता भरत असताना जबरदस्ती

lankeshbagul

New member
Bank Name
YES BANK
Loss Amount
700000
Ratings
5.00 star(s)
Opposite Party Address
YES BANK PIMPAGOAN (WA) BR. TAL DEOLA DIST NASHIK PIN 423102
महोदय,
मी खाली सही करणारा लंकेश सिताराम बागुल, रा. फुलेमाळवाडी ता.देवळा जि. नाशिक, नमूद करतो की माझा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर (क्रमांक : MH41BH0640) हा येस बँक मार्फत कर्जावर घेतलेला आहे.
काही हप्ते थकीत असले तरी मी कर्ज फेडण्यास तयार होतो व माझ्या वतीने बँकेत थकीत हप्त्याचे पैसे भरले जात होते व ते प्रत्यक्षात भरले देखील गेले आहेत.
*घटनेचे तपशील
दिनांक 07/02/2026 रोजी येस बँकेच्या रिकव्हरी एजंटांनी माझ्या अनुपस्थितीत माझ्या शेडचे कुलूप तोडून बेकायदेशीररीत्या प्रवेश केला व कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता माझा ट्रॅक्टर जबरदस्तीने घेऊन गेले.
सविस्तर तक्रार अर्ज जोडला आहे कृपया पाहावे
 

Attachments

Back
Top